मुंबई : कतरिना कैफ, तब्बू आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे. बॉलीवूडचा दुसरा सिनेमा सनम रे, तर हॉलीवूडचा फ्लिक, डेडपूल या सिनेमांसोबत फितूरची स्पर्ध असेल.
अभिषेक कपूरनं दिग्दर्शन केलेला हा चित्रपट चार्ल्स डिकन्सच्या ग्रेट एक्सपेक्टेशनवर आधारित आहे. काश्मीरच्या नंदनवनामध्ये शूट केलेला हा चित्रपट सुरवातीलाच तुमच्या डोळ्याचे पारणे फेडून जातो. गेल्या काही दिवसांमधला बघण्यासारखा चांगला चित्रपट अशीच या चित्रपटाची समिक्षा करावी लागेल.
चित्रपटाची सुरुवात होते ती तरुण नुर म्हणजेच आदित्य रॉय कपूर आणि फिरदौस म्हणज कतरिना कैफ कसं आयुष्य जगत आहेत त्यापासून. तुम्ही कादंबरी वाचली असेल तर तब्बूनं केलेलं बेगमचं कॅरेक्टर आणि त्यातली मजा तुमच्या लगेच लक्षात येईल.
जसा चित्रपट पुढे जातो, तसं नुर आणि फिरदोस यांच्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे, हे उलगडत जातं. कतरिनानं फिरदौसच्या कॅरेक्टरमध्ये जीवंतपणा आणला आहे, असं चित्रपट बघताना सारखं वाटत राहतं.
आदित्य रॉय कपूरनंही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. पण तब्बू मात्र या चित्रपटामध्ये भाव खाऊन गेली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या वेगाविषयी तुम्ही संयम ठेवणार असाल, तर हा फितूर अजिबात मिस करु नका.