प्रदर्शनाआधीच 'मेरी कोम' महाराष्ट्रात झाला करमुक्त

बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित आणि संजय लीला भन्साळी निर्मित ‘मेरी कोम’ हा सिनेमा प्रदर्शनाआधीच महाराष्ट्रात करमुक्त म्हणून घोषित करण्यात आलाय. 

Updated: Aug 29, 2014, 08:09 PM IST
प्रदर्शनाआधीच 'मेरी कोम' महाराष्ट्रात झाला करमुक्त title=

मुंबई : बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित आणि संजय लीला भन्साळी निर्मित ‘मेरी कोम’ हा सिनेमा प्रदर्शनाआधीच महाराष्ट्रात करमुक्त म्हणून घोषित करण्यात आलाय. 

या चित्रपटात ‘मेरी कोम’च्या रुपात प्रियांका चोप्रा दिसणार आहे. बॉक्सर मेरि कोमनं ऑलिम्पिकमध्ये पाच वेळा विश्वविजेती म्हणून आपल्या नावाची नोंद केलीय.

मेरी कोमची भूमिका साकारणाऱ्या प्रियांकासाठीही हा एक वेगळाच अनुभव आहे. ‘हा चित्रपट म्हणजे एका पक्क्या विचारधारा असलेल्या एका स्त्रीची कथा आहे. मेरी कोमनं देशाचं नाव संपूर्ण विश्वात गाजवलं आहे. हा चित्रपट त्या सगळ्या खेळाडूंना समर्पित आहे ज्यांनी देशाचं नाव ठळ्ळकपणे जगासमोर आणलंय. या चित्रपटातून जर त्या सगळ्या खेळाडूंना बळ मिळत असेल तर आम्हालाही याचा अभिमान वाटेल’ असं प्रियांकानं म्हटलंय. 

महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्यानं चित्रपटाशी संबंधीत व्यक्तींनी महाराष्ट्राचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र सरकार यांचे आभार मानलेत. त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालंय... आणि यामुळे जास्तीत जास्त लोकांना मेरी कोमबद्दल माहिती होईल, असं चित्रपटाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.

संजय लीला भन्साळी यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट करमुक्त केल्यानं प्रेक्षकांचाही चांगाल प्रतिसाद या चित्रपटाला मिळेल. मेरी कोमच्या जीवनावर असलेला हा चित्रपट म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असलेल्या एका आईच्या मातृत्वाचीही कहाणी आहे. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही मेरी कोमनं आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बॉक्सिंग रिंगमध्ये एन्ट्री घेतली होती.  

उमंग कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाला महाराष्ट्र, बिहार आणि अन्य राज्यांनी करमुक्त केलं होतं. हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या जीवनावर होता आणि फरहान अख्तर मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत दिसला होता. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.