प्रियांका चोप्रा करणार मराठी चित्रपटात काम

 बॉलीवूड ते हॉलीवूड अशी उत्तुंग भरारी घेणारी देसी गर्ल  प्रियांका चोप्रा आता मराठी चित्रपटात काम करणार आहे. 

Updated: Jul 12, 2016, 08:13 PM IST
प्रियांका चोप्रा करणार मराठी चित्रपटात काम title=

मुंबई  :  बॉलीवूड ते हॉलीवूड अशी उत्तुंग भरारी घेणारी देसी गर्ल  प्रियांका चोप्रा आता मराठी चित्रपटात काम करणार आहे. 

तिच्याच "पर्पल पेबल पिक्‍चर्स‘ या प्रॉडक्‍शन हाऊसखाली बनणाऱ्या "व्हेंटिलेटर‘ या मराठी चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रियांकाचं चित्रीकरण नुकतचं पार पडलं असून  तिची भूमिका या चित्रपटातील कथेला कलाटणी देणारी असणार आहे..  

हा चित्रपट "फेरारी की सवारी' फेम  राजेश म्हापूसकर दिग्दर्शित करणार आहे. प्रियांका स्वत:"व्हेंटिलेटर‘ या मराठी चित्रपटात ती काम करणार असल्याने सिनेमाची उत्कंठा वाढली आहे.

या मराठी चित्रपटात मराठीतील आघाडीचे तब्बल 32 कलाकार असणार आहेत..प्रियांकाने या आधीही "कमिने", "अग्निपथ" आणि "बाजीराव मस्तानी‘ या चित्रपटांत यापूर्वी मराठी व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. "बाजीराव मस्तानी‘तील काशीबाईचे मराठीतील संवाद प्रियांकाने स्वतःच्याच आवाजात डब केले होते.