मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दिग्दर्शक मधुकर भंडारकर हे नविन सिनेमा काढत आहेत. या सिनेमाचे नाव आहे 'मॅडम जी'. प्रियंका प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत आहे. मात्र, या सिनेमातील भडक दृश्य कमी करण्याची मागणी प्रियंकाने केलेय.
या सिनेमात एका आयटम गर्लला नेता बनायचे असते. त्यावर आधारित सिनेमाचे कथानक आहे. प्रियंका आणि मधुर काही दिवसांपासून एक स्क्रिप्टवर एकत्र काम करीत आहेत. प्रियंकाने काही आरक्षणाबाबत सांगितले आहे. यातील काही लव्ह मेकिंग सिन्स कमी करण्याचे दीपिकानेच सांगितले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.
याआधी प्रियंका आणि मधुर यांनी फॅशन सिनेमासाठी एकत्र काम केले आहे. या सिनेमाला लोकांची पसंती मिळाली. या सिनेमासाठी प्रियंका चोप्राला राष्ट्रीय पुरस्कारही मिळला आहे. या सिनेमातही प्रियंकाने काही बदल सूचविले होते आणि ते बदल करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.