संगीतकार इलयराजाच्या मुलानं इस्लाम स्वीकारला, कारण...

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर इलयराजा यांच्या सगळ्यात छोट्या मुलानं – युवान शंकर राजानं यावर्षीच्या सुरुवातीलाच इस्लाम धर्म स्वीकारलाय... आपण धर्म बदलण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल युवाननं पहिल्यांदाच आपलं म्हणणं मांडलंय. 

Updated: Aug 13, 2014, 01:17 PM IST
संगीतकार इलयराजाच्या मुलानं इस्लाम स्वीकारला, कारण... title=

मुंबई : प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर इलयराजा यांच्या सगळ्यात छोट्या मुलानं – युवान शंकर राजानं यावर्षीच्या सुरुवातीलाच इस्लाम धर्म स्वीकारलाय... आपण धर्म बदलण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल युवाननं पहिल्यांदाच आपलं म्हणणं मांडलंय. 

दोन वर्षांपूर्वी आईच्या निधनानंतर तरुणाईत प्रवेश केलेला म्युझिक कम्पोजर युवान सतत तणावाखाली होता. त्यानंतर आपण कुराण वाचणं सुरु केलं आणि जानेवारी 2014 मध्ये इस्लाम धर्मानुसार आपली दिनचर्या सुरु केली... त्यानंतर आपण इस्लाम धर्म कबूल करण्याचा निर्णय घेतल्याचं युवाननं म्हटलंय.  

एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत युवाननं आपलं हे म्हणणं मांडलंय. वडिलांनी केलेल्या विरोधाला न जुमानता आपण धर्म परिवर्तनाचा निर्णय घेतल्याचं युवाननं म्हटलंय. 
महत्त्वाचं म्हणजे, युवानच्या धर्म परिवर्तनाच्या निर्णयाचं त्याच्या भावानं आणि वहिणीनं समर्थनच केलंय. धर्म परिवर्तनानंतरही युवाननं आपलं नाव मात्र कायम ठेवलंय.   

34 वर्षीय संगीतकार युवानचा आगामी सिनेमा ‘राजा नटवरलाल’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात युवाननं म्युझिक कम्पोज केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.