प्रियांका चोपडा 'अरबी दहशतवादी', 'नकली किम करदाशियाँ'

अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये सध्या प्रियांकाचे पोस्टर लागले आहेत. अमेरिकन टेलव्हिजन वाहिनीवर प्रियांकाची नवी मालिका क्वांटिकोचे हे पोस्टर आहेत.

Updated: Sep 24, 2015, 01:06 PM IST

प्रियांकाचं सुपर हिट गाणं  'एग्झॉटिक'

न्यू यॉर्क : अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये सध्या प्रियांकाचे पोस्टर लागले आहेत. अमेरिकन टेलव्हिजन वाहिनीवर प्रियांकाची नवी मालिका क्वांटिकोचे हे पोस्टर आहेत. मात्र अमेरिकेच्या जनमानसावर प्रियांका खरोखरंच छाप सोडू शकेल हा एक प्रश्न आहे.

प्रियांकाचा 'एग्झॉटिक' मिल्कशेक
यापूर्वी प्रियांकाने एका रेस्तराँमध्ये स्वत: एक मिल्कशेक बनवला होता, या मिल्कशेकचं नाव प्रियांकाने 'एग्झॉटिक' ठेवलं होतं. मिल्कशेक बनवला तेव्हा हजारो भारतीय रेस्तराँबाहेर जमले होते.

'परदेसी बाबू ने इस देसी दिल को मान लिया है' ?
'एक्झॉटिक' प्रियांकाच्या त्या गाण्याचंही नाव होतं, जे प्रियांकावर शूट करण्यात आलं होतं, त्या गाण्याच्या अल्बमध्ये रॅप गायक पिटबुलही होते.
हा अल्बम अमेरिकत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.

'अरबी दहशतवादी', 'नकली किम करदाशियाँ'
या गाण्यातील एक हिंदी ओळं आहे, 'परदेसी बाबू ने इस देसी दिल को मान लिया है', आता प्रियांकाची अमेरिकन टेलिव्हिजवर मालिका आल्यानंतर समजेल अमेरिकन प्रियांकाच्या अभिनयाला स्वीकारतात का?

सोशल मीडियावर परदेशी लोकांनी त्यावेळी प्रियांकाला 'अरबी दहशतवादी', 'नकली किम करदाशियाँ' देखील म्हणून टाकलं.

प्रियांकाला अमेरिकतून विरोधही
प्रियांका चोप्राला अमेरिकेतून मोठा विरोधही झाला आहे. प्रियांका दक्षिण आशिया खंडातून असल्याने, तुझा रंग सावळा आहे तरीही तू हॉलीवूड किंवा युरोपात कसं काम करू शकते असा विरोधही तिला झाला आहे.

'क्वांटिको'मध्ये दिसणार प्रियांका
'एबीसी टीव्ही'वरील शो 'क्वांटिको'मध्ये प्रियांका दिसणार आहे. भारतीय अमेरिकन अलेक्स पॅरिशच्या भूमिकेत प्रियांका दिसेल, जी एफबीआयसाठी काम करते. ही मालिका २७ सप्टेंबरपासून प्रसारीत होणार आहे.

अमेरिकेची बहुवंशीय ओळख बनवण्याचा प्रयत्न
अमेरिकन निर्माते नवनवीन खंडातील लोकांना संधी देत आहेत, यात अमेरिकेची बहुवंशीय म्हणून ओळख बनवण्याचा हा प्रयत्न आहे, याची सुरूवात आफ्रिकन-अमेरिकनपासून झाली, त्यानंतर आशियाई, लॅटिन मूळ असलेल्या कलाकारांना संधी देण्यात आली. यानंतरही हा प्रश्न आहे की, सावळा रंग असणारे किती कलाकार अमेरिकन टेलिव्हिजन मालिकांमध्ये आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.