प्रियंका चोपडाने चाहत्याच्या कानाखाली लगावली

प्रियंका चोपडाने चाहत्याच्या कानाखाली लगावली.

Updated: Dec 23, 2015, 08:09 PM IST
प्रियंका चोपडाने चाहत्याच्या कानाखाली लगावली title=

मुंबई : बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. बाजीराव मस्तानीमध्ये केलेल्या भूमिकेचंही सर्वत्र कौतूक होत आहे. 

जय गंगाजल हा प्रियंकाचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकाने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच करतांना तिने एका तिच्या फॅनच्या कानाखाली लगावली होती असा खुलासा केला आहे.

प्रियंकाने सांगितली की 'शुटिंगदरम्यान त्या व्यक्तीने तिच्यासोबत चुकीचा व्यवहार केला. त्या फॅनने एक फोटो काढण्यासाठी मला आग्रह केला पण त्या दरम्यान त्याने माझा हात पकडला म्हणून मी त्याच्या कानाखाली लगावली.'  

फॅनच्या कानाखाली लगावल्यानंतर प्रियंका एवढी घाबरली की ती लगेचच तेथून निघून गेली.