प्राची देसाई साकारणार अझरच्या पहिल्या पत्नीची भूमिका

अभिनेत्री प्राची देसाई, टीम इंडियाचा माजी कर्णधार अझरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते एकदम घट्ट आहे. क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सौदर्यवतींच्या प्रेम प्रकरणांवर माध्यमांमध्ये खमंग चर्चा होते.

Updated: Dec 29, 2014, 09:10 PM IST
प्राची देसाई साकारणार अझरच्या पहिल्या पत्नीची भूमिका title=

मुंबई : अभिनेत्री प्राची देसाई, टीम इंडियाचा माजी कर्णधार अझरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते एकदम घट्ट आहे. क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सौदर्यवतींच्या प्रेम प्रकरणांवर माध्यमांमध्ये खमंग चर्चा होते.

काही वर्षांपूर्वी  मोहंम्मद अझरुद्दीन आणि अभिनेत्री संगीता बिजलानीच्या प्रेम प्रकरणांची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. 

अखेर १९९६ मध्ये अझरने आपली पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला आणि संगीत बिजलानीशी विवाह केला. अजूनही या दोघांचा विवाह टिकून आहे मात्र अधन-मधन दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या येत असतात.

असो, एक यशस्वी क्रिकेटपटू आणि त्याच्या वैवाहिक आयुष्यातील चढ-उतार जाणून घेण्यात माध्यमांइतकाच सर्वसामान्यांना रस असतो. म्हणून नव्वदच्या दशकात गाजलेल्या या प्रेम प्रकरणावर चित्रपट येत आहे.

इमरान हाश्मी साकारणार अझरची भूमिका
इमरान हाश्मी या चित्रपटात मोहोम्मद अझरुद्दीनची व्यक्तीरेखा साकारणार असून, प्राची देसाई अझरची पहिली पत्नी नौरीन रंगवणार आहे. करीना कपूर संगीता बिजलानीच्या भूमिकेत असू शकते.

अझर एक यशस्वी क्रिकेटपटू असूनही नौरीन कधीही प्रसिध्दीच्या झोतात आली नाही. संगीता बिजलानी बरोबर अझरचे प्रेमप्रकरण सुरु असताना तो काळ नौरीनसाठी कसा होता.तिची मानोअवस्था कशी होती. माध्यमांपासून दूर राहिलेल्या एका यशस्वी खेळाडूच्या पत्नीची घुसमट पडद्यावर साकारणे आव्हानात्मक असल्याने प्राचीने ही चित्रपट स्वीकारला.

२०१० मध्ये आलेल्या वन्स अपवॉन अ टाईम इन मुंबई या चित्रपटात प्राची शेवटची दिसली होती. या चित्रपटातही तिने इमरानच्या समजूतदार प्रेयसीची भूमिका साकारली होती. एकता कपूरची बालाजी प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.