विद्या बालनच्या 'बेगम जान' ट्रेलरचा जलवा, एकदम बोल्ड भूमिका

 विद्या बालनच्या  'बेगम जान' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला लाखोंच्या हिट्स मिळत आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2017, 01:58 PM IST
विद्या बालनच्या 'बेगम जान' ट्रेलरचा जलवा, एकदम बोल्ड भूमिका title=

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनच्या 'बेगम जान' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला लाखोंच्या हिट्स मिळत आहे. सध्या ट्रेंगिगमध्ये हा ट्रेलर यू-ट्यूबवर नंबर वन आहे.

या सिनेमात विद्या बालनसोबतच नसिरुद्धीन शाह, रजत कपूर, गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विद्याचा जबरदस्त लूक बघायला मिळतोयं. डर्टी सिनेमा असो, कहाणी किंवा आता बेगम जान, विद्या बालनच्या प्रत्येक सिनेमात तिच तिच्या सिनेमाची हिरोईन असते आणि तिच हिरो. महेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्सची निर्मिती असलेल्या बेगम जान या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झालाय. 

भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर हा कोठा स्थित असल्याचा दावा केला जातो, या सिनेमाची कथा या कोठ्याच्या विभाजनाच्या आधारित आहे. या कोठ्याची मालकीण आहे विद्या बालन. विद्या इथे तिच्या काही मुलींसोबत राहत असते. या सगळ्या मुलींना घेऊऩ आपलं घर वाचवण्यासाठीचा संघर्ष या सिनेमात मांडण्यात आलाय.

स्त्रीजीत मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा बंगाली सिनेमा राजकहिनीचा रिमेक आहे. राजकहिनीचे दिग्दर्शन ही स्त्रीजीतनं केलें होतं. बेगम जान हा सिनेमा येत्या14 एप्रिला प्रदर्शित झाला आहे.  सिनेमातील संवाद हार्ड हिटींग वाटतात. या सिनेमात तुम्हाला काही शिव्या ही ऐकू येतील. अशा प्रकारच्या शिव्या देणं विद्या बालनला सहज जमलं का?  

यासिनेमातील विद्या बालनचा अभिनया हा तिच्या करिअरमधला आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा सगळ्यात जास्त बोल्ड आहे. या सिनेमातील ट्रेलरमधली विद्याची झलक पाहा