झी मराठीवर येतेय नवी मालिका "चूक भूल द्यावी घ्यावी"

नाटक, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोटया पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येतायत.

Updated: Dec 24, 2016, 09:55 AM IST
झी मराठीवर येतेय नवी मालिका "चूक भूल द्यावी घ्यावी" title=

मुंबई : नाटक, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोटया पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येतायत.

दिलीप प्रभावळकर यांचे "चूक भूल द्यावी घ्यावी" या प्रसिद्ध नाटकावर आधारित झी मराठीवर लवकरच नवी मालिका येत आहे. या मालिकेत दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय,

तसेच या मालिकेची निर्मिती मनवा नाईक करत असल्याची माहिती आहे. दिलीप प्रभावळकर यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेत साकारलेले आबा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेनंतर १५ वर्षांनी ते पुन्हा मालिकेत दिसणार आहेत.