'बेफिक्रे'चे नवे हॉट पोस्टर रिलीज

आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'बेफिक्रे'चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून दोघांनीही यात हॉट किसींग सीन्स दिल्याचे बोलले जात आहे. तर चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरही दोघांचा किसींग सीन असलेला फोटोच देण्यात आला आहे.

Updated: Aug 10, 2016, 04:34 PM IST
'बेफिक्रे'चे नवे हॉट पोस्टर रिलीज  title=

मुंबई : आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'बेफिक्रे'चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून दोघांनीही यात हॉट किसींग सीन्स दिल्याचे बोलले जात आहे. तर चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरही दोघांचा किसींग सीन असलेला फोटोच देण्यात आला आहे.

दक्षिणात्य चित्रपटांमध्ये वाणी कपूर अधिक प्रसिद्ध आहे. वाणीने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत काम केले होते. तिच्या कामाचंही कौतुक झालं होतं. आता ती ब-याच वर्षांनी हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दोघांची वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 

चित्रपटाचे पोस्टर रणवीर सिंगने त्याच्या फेसबूक आणि ट्विटरवर शेअर केले आहे. ७ वर्षांनी आदित्य चोप्रा चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. याआधी त्याने शाहरूख - अनुष्काच्या रबने बना दि जोडीचं दिग्दर्शन केलं होतं. रणवीर आणि वाणी हे पहिल्यांदाच एकत्र सिनेमा करत आहे. हा चित्रपट ९ डिसेंबरला रिलीज होणार आहे.