मुंबई: मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत सिनेमात नर्गिस फखरी त्याची दुसरी पत्नी संगिता बिजलानीच्या हिच्या भूमिकेत दिसणार आहे.
अझरुद्दीनची पहिली पत्नी नौरिनची भूमिका प्राची देसाई साकारत आहे, तर अझरच्या भूमिकेत इमरान हाशमी दिसणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूमिकेबाबत नर्गिससोबत बोलणी करण्यात आली आहे, तसेच नर्गिसने या भूमिकेसाठी होकारही दिला आहे.
ही भूमिका करिना कपूर करणार असल्याचीदेखील चर्चा होती, मात्र ही चर्चा अफवा ठरली आहे.
संगिता बिजलानीच्या भूमिकेसाठी ग्लॅमरस अभिनेत्रीची गरज होती, कारण संगिता बिजलानी खूप स्टायलिश म्हणून ओळखली जाते. या सर्व बाबींच्या आधारावर या भूमिकेसाठी नर्गिसची निवड करण्यात आली आहे.
रॉकस्टार, में तेरा हिरो आणि मद्रास कॅफे यांसारख्या सिनेमात नर्गिसने अभिनय केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.