मुंबई : नुकतीच मुंबईतल्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सैराटचं यश सेलिब्रेट करण्यात आलं. यावेळी नागराजनं आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या भाषेत म्हणजेच तेलगूमध्ये सिनेमा बनवायचं असल्याचं म्हटलंय.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्या तालुक्यातल्या जेऊर गावातल्या वडार समाजातून येऊन नागराज मराठी सृष्टीत स्थिरावलाय. तेलगू बोलणारे लोक तुच्छ मानले जात होते... पण, मला मात्र माझ्या मातृभाषेचा तेलगुचा अभिमान आहे... सैराटच्या रिमेकच्या निमित्तानं का होईना पण, तेलगु शिकता येईल, अशी भावना यावेळी नागराजनं व्यक्त केली. 'सैराट'ला तेलगुमध्येही असंच भरघोस यश मिळेल, अशी आशाही त्यानं यावेळी व्यक्त केली...
काय काय म्हणाला नागराज ऐका त्याच्याच शब्दांत...