TRAILER : 'नाम शबाना'... अक्षयला करायला काही उरलंच नाही!

अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी - 2' प्रदर्शित झाल्यानंतर आता लगेचच त्याचा 'नाम शबाना' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Updated: Feb 11, 2017, 12:10 PM IST
TRAILER : 'नाम शबाना'... अक्षयला करायला काही उरलंच नाही! title=

मुंबई : अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी - 2' प्रदर्शित झाल्यानंतर आता लगेचच त्याचा 'नाम शबाना' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

शुक्रवारी सायंकाळी या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. शिवम नायर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. नीरज पांडे या सिनेमाचा प्रोड्युसर आहे...

'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू 'नाम शबाना' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका अंडर कव्हर एजन्टच्या भूमिकेत तापसी पन्नू दिसेल. 

हा सिनेमा नीरजचा सिनेमा 'बेबी'चा स्पिन ऑफ आहे... अर्थात, बेबीच्या अनेक मागे पडलेल्या मुद्यांना एकत्रित करून नवा सिनेमा बनवण्यात आलाय. 

अक्षय आणि तापसीशिवाय या सिनेमात मनोज वाजपेी आणि दक्षिण भारतीय अभिनेता पृथ्वीराजही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं शूटिंग मलेशियात पार पडलंय.