'माय मुंबई' लघुपट महोत्सवाचे आयोजन

येथे 'माय मुंबई' लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिरात हा महोत्सव १६ ते १८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. 

Updated: Oct 20, 2015, 06:01 PM IST
'माय मुंबई' लघुपट महोत्सवाचे आयोजन   title=

मुंबई : येथे 'माय मुंबई' लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिरात हा महोत्सव १६ ते १८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. 
 
'युनिव्हर्सल मराठी' सोबत 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' आणि 'सांस्कृतिक कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य' यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदा महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. तीन दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवात लघुपटांच्या स्क्रीनिंगसोबत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या महोत्सवासाठी शॉर्टफिल्ममेकर्सकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

या महोत्सवाचा यावर्षी विस्तार वाढविण्यात आला आहे. सामाजिक जनजागृती (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय लघुपट(इंटरनॅशनल), अॅनिमेशनपट, मोबाईल शूट फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म) या वर्गवारीसोबत संगीतपट (म्युझिक विडीओ) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) या दोन वर्गवारीची वाढ करण्यात आली आहे, अशा या वर्गवारींसाठी विनामूल्य ऑनलाइन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१५ ही आहे. अधिक माहितीसाठी www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.