आर्चीच्या मदतीला मनसे

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातील आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरुच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आलीये. 

Updated: Aug 12, 2016, 12:43 PM IST
आर्चीच्या मदतीला मनसे title=

ठाणे : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातील आर्चीची भूमिका करणारी रिंकू राजगुरुच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आलीये. 

गेल्या काही दिवसांपासून आर्चीचा मॉर्फ केलेला अश्लील फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल होतोय. 

या प्रकरणी मनसेने पोलिसांकडे तक्रार दाखल केलीये. अशा प्रकारचे फोटो बनविणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करत त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीये.

यासंबंधीचे निवेदन मनसेचे कल्याण पश्चिमेचे माजी आमदार आणि शहराध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पोलिसांना दिले.