MOVIE REVIEW - वायझेड

रुस्तम आणि मोहनजोदडोसोबतच या विकेन्डला आणखी एक सिनेमा आपल्या भेटीला आलाय. या सिनेमाचं नाव आहे वाय झेड. अभिनेत्री सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, सागर देशमुख, अक्षय टंकसाळे अशी कलाकारांची भली मोठी फौज असलेल्या वाय झेड या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय समीर विद्वांस यांनीय 

Updated: Aug 12, 2016, 11:41 AM IST
MOVIE REVIEW - वायझेड title=

मुंबई : रुस्तम आणि मोहनजोदडोसोबतच या विकेन्डला आणखी एक सिनेमा आपल्या भेटीला आलाय. या सिनेमाचं नाव आहे वाय झेड. अभिनेत्री सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, सागर देशमुख, अक्षय टंकसाळे अशी कलाकारांची भली मोठी फौज असलेल्या वाय झेड या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय समीर विद्वांस यांनीय 

वाय झेड या सिनेमाच्या नावाप्रमाणेच सिनेमाची गोष्टही जरा हटके आहे. तिशी ओलांडलेला गजानन, एक अत्यंत साधा भोळा प्रोफेसर आहे. त्याच्या आयुष्यात त्याला कुणी मित्र नाही, मैत्रीण नाही, स्वत:ला कायम कमी लेखणारा असा हा गजानन. 

काही कारणास्तव गजाननची बदली पुण्यात होते. पुण्यात आल्यावर गजाननची भेट एका अशा व्यक्तीशी होते की ज्यामुळे गजाननचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. याचं नाव बत्तीस. बत्तीस हा खरंतर गजाननचा विद्यार्थी मात्र तोच आता गजाननचा गुरु झालाय. 

कायम मुलीकडून रिजेक्ट होणा-या गजाननच्या जीवनात अखेर पर्णरेखाची एंट्री होते मग काय घडतं? खरंतर आपल्या प्रत्येकात काहीतरी स्पेशल असतं, प्रत्येक माणसात असं काहीतरी टॅलेंट असतं जे खरंतर आपल्यालाच शोधावं लागतं. अशा काहीशा पार्श्वभूमीवर वाय झेड हा सिनेमा आधारित आहे.

दिग्दर्शक समीर विद्वांस ज्यानं या आधी टाईम प्लीज, डबल सीट असे दर्जेदार सिनेमे दिले. वायझेडमध्ये समीरनं या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा हाताळण्याचा प्रयत्न केलाय.. समीर यात ब-यापैकी यशस्वीही झालाय. 

सिनेमाचा पूर्वार्ध खूपच इंटरेस्टींग वाटतो, मजेशीर वाटतो. विशेष करुन सिनेमाचे संवाद अप्रतिम आहेत, आउट ऑफ द बॉक्स आहेत. याचं सगळं श्रेय जातं ते लेखक क्षितीज पटवर्धनला. खरं तर हटके संवादामुळेच सिनेमा एंटरटेनिंग वाटतो.. मात्र सिनेमाचा उत्तार्ध साधारण वाटतो. त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा दिसतात. सिनेमाचा स्क्रीनप्ले ही जरा भरकटलेला वाटतो.

अभिनेता सागर देशमुख आणि अक्षय टंकसाळे या दोघांचा अभिनय कमाल झालाय. सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत या दोघांनीही जबरदस्त बॅटिंग केलीये. अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे यांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत. या सिनेमाची खरी स्ट्रेन्थ आहे यातले संवाद.. तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता वायझेड सिनेमाला ३ स्टार्स.