मिथूनकडे आहे 240 कोटी रुपयांची संपत्ती

अभिनेता मिथून चक्रवर्ती नुकताच 66 वर्षांचा झाला आहे. 16 जून 1950 ला मिथूनचा जन्म कोलकत्यामध्ये झाला होता.

Updated: Jun 18, 2016, 11:31 PM IST
मिथूनकडे आहे 240 कोटी रुपयांची संपत्ती title=

मुंबई : अभिनेता मिथून चक्रवर्ती नुकताच 66 वर्षांचा झाला आहे. 16 जून 1950 ला मिथूनचा जन्म कोलकत्यामध्ये झाला होता. मिथूनचं खरं नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मिथून हा फक्त अभिनेता नसुन तो 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चा मालकही आहे. आज मिथूनकडे तब्बल 240 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

तामिळनाडूतलं उटी, मसिनागुडी आणि कर्नाटकमधलं मैसूर या ठिकाणी मिथूनच्या मालकिची लग्झरी हॉटेल्स आहेत. मिथूनच्या फक्त उटीमधल्या हॉटेलमध्येच 59 खोल्या, 4 लग्झरी सुट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाईट काऊ बॉय बार ऍन्ड डिस्को याबरोबरच किड्स कॉर्नर आहे. 

मसिनागुडीमधल्या हॉटेलमध्ये 16 एसी बंगले, 14 ट्विन्स मचांस, 4 स्टॅन्डर्ड रूम, मल्टीकुशन रेस्टॉरंट आणि चिल्ड्रन प्ले ग्राऊंड आहे. याबरोबरच जीपमधून जंगल राईड, हॉर्स रायडिंग यासारख्या सुविधाही या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. 

मिथूनच्या मैसूरमधल्या हॉटेलमध्ये 18 एसी कॉटेज, 2 एसी सुट्स, ओपन एअर मल्टीकुशन रेस्टॉरंट याबरोबरच स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रॅव्हल रिलेडेट सुविधाही उपलब्ध आहेत.