व्हिडिओ : Opps! 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतली घोडचूक वायरल!

यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत बाजी मारली ती मिस फिलिपाईन्स पिया अलोन्झोनं... पण, तिनं हा प्रतिष्ठेचा मुकूट आपल्या डोक्यावर धारण करण्याआधी तो चुकीनं दुसऱ्याच स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवण्यात आला.

Updated: Dec 22, 2015, 11:51 AM IST
व्हिडिओ : Opps! 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतली घोडचूक वायरल! title=

लॉस वेगास : यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत बाजी मारली ती मिस फिलिपाईन्स पिया अलोन्झोनं... पण, तिनं हा प्रतिष्ठेचा मुकूट आपल्या डोक्यावर धारण करण्याआधी तो चुकीनं दुसऱ्याच स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवण्यात आला.

मिस कोलंबिया अॅड्रियाना गुट्रेझ हिला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं... त्यानंतर, मिळालेल्या यशामुळे अॅड्रियानाचे डोळेही भरून आले... तिनं ओल्या डोळ्यांनी चाहत्यांचे आभारही मानले... पण, त्यानंतर मात्र तिच्या डोक्यावरून हा मुकूट काढून फिलिपाईन्सच्या पियाला चढवण्यात आला.

इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात इतका मोठा घोळ साहजिकच चर्चेचा विषय ठरलाय... हा व्हिडिओ आता सोशल वेबसाईटवर वायरल होतोय.