मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीतच म्हणते की, आता लेडी सिंघमची इच्छा आणि दुसऱ्याच शुक्रवारी मोठ्या पडद्यावर राणी मुखर्जी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसते आणि ती काय दिसते... पुरुषांची विचारसरणी, त्यांची स्टाइल पकडून त्याच पुरुषांना मर्दानी मात देतेय. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 22, 2014, 05:22 PM IST
मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'! title=

मुंबई: सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीतच म्हणते की, आता लेडी सिंघमची इच्छा आणि दुसऱ्याच शुक्रवारी मोठ्या पडद्यावर राणी मुखर्जी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसते आणि ती काय दिसते... पुरुषांची विचारसरणी, त्यांची स्टाइल पकडून त्याच पुरुषांना मर्दानी मात देतेय. 

फिल्म 'मर्दानी' म्हणजे चोर - पोलीसाचा खेळ. मात्र चाईल्ड ट्रॅफिंकिंगची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवलीय. वर्षानुवर्ष सुरू असलेला देह व्यापार आणि त्यात लहान मुलींना ओढलं जातं, या सर्वांविरोधान मर्दानी अर्थात शिवानी रॉयचा लढा. राणी आणि ताहिर भसीनची जबरदस्त अॅक्टिंग यात आपल्याला पाहायला मिळते. 

आकडेवारीनुसार भारतात प्रत्येक आठ मिनिटाला एक मुलगी बेपत्ता होते. जगातील चाइल्ड सेक्सच्या अवैध व्यापाराचा भारत मोठं केंद्र आहे. गरीब, अनाथ मुलींचं अपहरण सर्रास होतंय. तर पॉवरफुल व्यक्तीकडून त्यांचं शोषण केलं जातं. हाच विषय घेऊन चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकारनं 'मर्दानी' बनवलाय.

पटकथा

गोपी पुथरन यांनी लिहिलेली पटकथा... कोणत्याही गुन्हेगारापर्यंत पोलीस कसं पोहोचतात, चित्रपटात हे पाहणं आपल्याला खूप आवडेल. शिवानी रॉय (राणी मुखर्जी) क्राइम ब्रान्चमध्ये सीनिअर इन्स्पेक्टर आहे. आपला नवरा आणि पुतणीसोबत ती राहते. ती खूप शूर आणि पराक्रमी आहे. ती शिव्याही देते आणि कुटुंबाला प्राथमिकता देत ते ही व्यवस्थित सांभाळते. रस्त्यावर फुलं विकणारी मुलगी 'प्यारी' तिला खूपच प्रिय आहे. ती प्यारी आपली मुलगीच मानते. 

'प्यारी' जेव्हा शिवानीला तीन-चार दिवसांपासून दिसत नाही, तेव्हा ती शोध घ्यायला लागते. तेव्हा तिला कळतं की, प्यारीचं निव्वळ अपहरणच झालं नाही तर तिच्यासारख्या अनेक मुलींसोबत देहव्यापारासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीच्या जाळ्यात फसलीय. ही टोळी अशी एक व्यक्ती चालवतो ज्याला कोणीही ओळखत नाही. शिवानी त्याविरोधात लढते आणि अखेर यशस्वी होते. 

अभिनय

चित्रपटाची सुरुवात संथ वाटते मात्र हळुहळू फिल्म आपली पकड मजबूत करते आणि प्रेक्षकांना खिळविण्यातही यशस्वी होते. चित्रपटात राणी मुखर्जी किती ऑलराऊंडर अभिनेत्री आहे हे आपल्याला जाणवतं. मर्दानी राणीच्या करिअरमधील बेस्ट चित्रपटांच्या यादीत नक्की असेल. इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील कडकपणा, आपल्या सहकाऱ्यांसोबत सहजता आणि घरातील ममता, प्रेम... या तिन्ही भूमिका राणीनं खूप चांगल्या पद्धतीनं निभावल्यात. 

राणी मुखर्जीतील आग तर सगळ्यांनाच माहिती आहे पण या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ताहिर भसीन. या मुलानं खलनायकच्या भूमिकेत जीव ओतलाय. व्हिलनमध्ये शांत क्रूरता त्यानं दाखवलीय. चित्रपटात जोपर्यंत स्थिती त्याच्या हाती असते. तोपर्यंत तो शांत आणि मॅडम मॅडम वाला अंदाज घेऊन असतो. मात्र जेव्हा परिस्थिती त्याच्या हातून निसटते. तेव्हा तो कुत्री या शब्दावर येतो. 

राणी आणि ताहिर शिवाय छोट्या-छोट्या भूमिकाही उत्तम साकारल्यायेत. दिग्दर्शक प्रदीप सरकारनं कास्टिंगवर खूप काम केलेलं दिसतंय. चित्रपटात मेलोड्रामासह सर्व प्रकारचे रस असून देखील चित्रपटाचा शेवट सोडून मर्दानी लाऊड होत नाही. चित्रपटात दिल्ली, मुंबईचं दुसरं रूप आपल्याला पाहायला मिळतं. 

कथा फक्त महिला पोलिसाचा संघर्ष दाखवत नाही तर देह व्यापार आणि अपहरणाच्या निमित्तानं पुरुषांची मानसिकताही दर्शवितो. ज्युनिअर जेव्हा म्हणतो की, तुम्ही महिला खूप इमोशनल होतात किंवा इगोवर घेता. तेव्हा तो संपूर्ण समाजाच्या विचाराला आव्हान देतो आणि राणी जेव्हा आपलं हत्यार फेकून ताहिरला लढायला आव्हान देते तेव्हा ते सर्कल पूर्ण होतं. 

हा चित्रपट जरूर पाहावा. मात्र चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळालंय. त्यामुळं नक्कीच लहान मुलांसोबत तो बघू नये. 

बॅनर : यश राज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपडा
दिग्दर्शक : प्रदीप सरकार
कलाकार : राणी मुखर्जी, जीशु सेनगुप्ता, ताहिर राज भसीन

पाहा व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.