फिल्म रिव्ह्यू - मराठीतील वेगळा प्रयोग 'राजवाडे'

अतुल कुलकर्णी निर्मीत, सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे एन्ड सन्स ही कथा आहे बदलत्या एकत्र कुटुंबाची, बदलत्या विचारांची आणि बदलत्या नात्यांची.. अर्थातच जॉइंट फॅमिली म्हटल्यावर सिनेमात कलाकारांची संख्याही तितकीच मोठी आहे.. सतिश आळेकर, ज्योती सुभाष, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव अशी भली मोठी स्टारकास्ट या सिनेमात आपल्याला पहायला मिळते..

Updated: Oct 16, 2015, 09:17 PM IST
फिल्म रिव्ह्यू - मराठीतील वेगळा प्रयोग 'राजवाडे'  title=

जयंती वाघधरे , झी मीडिया, मुंबई : अतुल कुलकर्णी निर्मीत, सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे एन्ड सन्स ही कथा आहे बदलत्या एकत्र कुटुंबाची, बदलत्या विचारांची आणि बदलत्या नात्यांची.. अर्थातच जॉइंट फॅमिली म्हटल्यावर सिनेमात कलाकारांची संख्याही तितकीच मोठी आहे.. सतिश आळेकर, ज्योती सुभाष, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव अशी भली मोठी स्टारकास्ट या सिनेमात आपल्याला पहायला मिळते..

काय आहे कथा 
राजवाडे एन्ड सन्स ही गोष्ट आहे रमेशराव राजवाडे आणि त्यांच्या कुटुंबाची.. रमेशराव राजवाडे हे घरातले कुटुंब प्रमुख.. अतिशय कष्टानं आपला व्यवसाय त्यांनी उभारलेला असतो.. याच व्यवसायात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही उतरून तो वाढवावा अशी त्यांची इच्छा असते..  त्यांना सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणेच हवं असतं.. त्यांच्या परवानगी शिवाय कुणाचं पान ही हलत नाही.. शुभंकर, लक्ष्मी आणि विद्याधर ही या घरातली दुसरी पिढी.. घरातल्या दुस-या पिढीनं तर सगळ्या गोष्टी रमेशराव यांच्याच सांगण्यावरुन केल्या पण आता घरातली तिसरी जेनरेशन काय करणार.. हा प्रश्न निर्माण होतो. अशातच घरातली ही तिसरी पिढी या चौकटीतून बाहेर पडते का?  आपआपल्या स्वप्नांना साकार करायला आपआपला मार्ग धरते का?. या साठी सिनेमा तर तुम्हाला पाहावाच लागेल.. खरं पाहिलं तर राजवाडे एन्ड सन्स या सिनेमाला तशी गोष्टच नाही, हा एक सिच्युएशनल सिनेमा आहे.. 

कसं झालं दिग्दर्शन 
सचिन कुंडलकर यांच्यासाठी राजवाडे एन्ड सन्स हा पहिलाच कुटुंब पट.. आजवर सचिन कुंडलकर यांनी अनेक फ्लेवरचे सिनेमे दिले. अतुल कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर यांनी एकत्र सुरू केलेल्या या निर्मीती संस्थेचा हा पहिला सिनेमा.. एकत्र कुटुंबावर आधारीत सिनेमा असल्यामुळे या सिनेमाचा कॅनवास ही तसा खूप भव्य आहे.. सिनेमातले लोकेशन्स, कॉस्च्युम्स, सादरीकरण या गोष्टींमध्ये  निर्मात्यांनी बजटवाइस काहीच कमी ठेवली नाहीये.. सिनेमाच्या मांडणी विषयी बोलायचं झालं तर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सिनेमाला करेक्ट ट्रीटमेंट देण्यात कुठेही मागे पडले नाहीत.. 

कसा झाला अभिनय
सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, राहुल मेहेंदळे यांचा परफोरमन्स छान झालाय.. अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली व्यक्तिरेखा खुपच इंटरेस्टींग आहे, त्यांचा अभिनय ही छान झालाय.. मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ मेनन, अलोक राजवाडे, कृतिका देव या यंग ब्रिगेडनंही चांगला परफॉर्मन्स दिलाय.. या सिनेमात एक सरप्राइस पॅकेजमध्ये दिसतो अभिनेता अमित्रीयान पाटील.. अमित्रीयान पाटील या नटाच्या निमित्तानं मराठी सिनेजगताला आणखी एक फ्रेश चेहरा मिळालाय एवढं नक्की..

कशी आहेत गाणी 
सिनेमात दोनच गाणी आहेत पर सुंदर आहेत.. सिनेमाचा बॅकग्राउंडस्कोरही छान झालाय.. सिनेमा करताना अनेक एक्सपेरिमेन्ट्स करण्यात आलेत हे सिनेमा पाहताना जाणवतं.. राजवाडे एन्ड सन्सची सिनेमाटोग्राफीही कमाल आहे.. या सिनेमातली जी गोष्ट खटकते ती म्हणजे यातल्या पटकथेत अचानकपणे घडणारे बदल.. यातले काही बदल सिनेमाच्या फ्लोसोबत जात नाही.. काही सीन्स थोडेसे चॉप करता आले असते असं वाटतं..

अतुल कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर या दोघांनीही मराठी बिग स्क्रीनवर एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय.. 

पाहा व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.