अभिनेत्री ममता कुलकर्णीला अटक

अभिनेत्री ममता कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे, ड्रग्स तस्करी प्रकरणी ममता कुलकर्णीला हिला अटक करण्यात आली आहे. तसेच तिचा पती विजय गोस्वामी उर्फ विकी गोस्वामी याची देखिल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Updated: Nov 13, 2014, 11:22 AM IST
अभिनेत्री ममता कुलकर्णीला अटक title=

केनिया : अभिनेत्री ममता कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे, ड्रग्स तस्करी प्रकरणी ममता कुलकर्णीला हिला अटक करण्यात आली आहे. तसेच तिचा पती विजय गोस्वामी उर्फ विकी गोस्वामी याची देखिल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

ममता कुलकर्णीने २०१२ मध्ये ड्ग्स तस्कर विकी गोस्वामीशी लग्न केलं होतं, १९९७ मध्ये विक्की गोस्वामीला ६० लाख डॉलरच्या ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला दुबईत ही अटक झाली होती.

बॉलीवूडमध्ये ममता कुलकर्णीने २५ पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. ममता बॉलीवूडमध्येही सतत चर्चेत असायची स्टार डस्टच्या कव्हर पेजवर टॉपलेस फोटो आल्यानंतर ती अधिक चर्चेत आली आणि तिचं बॉलीवूडमध्ये आगमन झालं.

राकेश रोशन द्वारा दिग्दर्शित चित्रपट ' करण अर्जुन ' ( 1995), मध्ये ममता कुलकर्णीने शाहरुख खान आणि सलमान खान सोबत अभिनय केलाय

ममताचे काही चित्रपट
आशिक आवारा (1993), वक्त हमारा है (1993), क्रांतिवीर (1994), करण अर्जुन (1995), सबसे बड़ा खिलाड़ी (1995), बाजी (1996 ), चीन गेट (1998), बेक़ाबू (1995 ), छुपा रुस्तम (2001) ' आशिक आवारा ' ( 1993) या चित्रपटासाठी ममता कुलकर्णीला 1994 मध्ये फ़िल्मफ़ेयर मिळालं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.