मलाइका - अरबाज खान पुन्हा एकत्र

२०१६ या वर्षाची सुरुवात बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअपने झाली. यामध्ये अरबाज खान आणि मलाईका अरोडा खान या जोडीचा ही समावेश आहे. दोघांमध्ये काही दिवसांपासून जमत नसल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर त्यांची फारकत होणार असल्याचाही बातम्या आल्या होत्या.

Updated: May 18, 2016, 09:50 PM IST
मलाइका - अरबाज खान पुन्हा एकत्र title=

मुंबई : २०१६ या वर्षाची सुरुवात बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअपने झाली. यामध्ये अरबाज खान आणि मलाईका अरोडा खान या जोडीचा ही समावेश आहे. दोघांमध्ये काही दिवसांपासून जमत नसल्याच्या बातम्या येत होत्या त्यानंतर त्यांची फारकत होणार असल्याचाही बातम्या आल्या होत्या.

मलाइका आणि अरबाज यांच्यातली कटुता आता दुर झाल्याचं समोर येतंय. आणि दोघांनी पुन्हा एकदा एकत्र राहण्याचं ठरवलं आहे. ६ महिन्यांपासून मलाईका आपल्या मुलासोबत वेगळी राहत असल्याचं समोर आलं होतं.