'मकडी'फेम श्वेता पुन्हा एकदा चर्चेत

'मकडी'फेम अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

Updated: Jul 16, 2016, 02:47 PM IST
'मकडी'फेम श्वेता पुन्हा एकदा चर्चेत  title=

मुंबई : 'मकडी'फेम अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

हैदराबादमध्ये दोन वर्षांपूर्वी श्वेताला देहविक्रीच्या धंद्यात अटक करण्यात आली होती. तेव्हा तिच्याविषयी बरीच उलट सुलट चर्चा झाली होती. त्यानंतर आता श्वेता पुन्हा चर्चेत आलीय ती तिच्या अफेअरमुळे... 

 

 

#Britto's #Goa

A photo posted by shwetabasuprasad11 (@shwetabasuprasad11) on

जवळपास दोन महिने तुरुंगात काढलेली श्वेता आता प्रेमात पडलीय. त्या प्रकरणानंतर श्वेताला लगेचच अनुराग कश्यपकडून काम करण्याची संधी मिळाली होती. स्क्रिप्ट रायटर म्हणून ती त्याच्या 'फॅन्टम फिल्म्स' या प्रोडक्शन कंपनीमध्ये रुजू झाली. इथंच तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळालाय. 

रोहीत मित्तल या उभरत्या सिनेनिर्मात्याच्या ती प्रेमात पडलीय. फेब्रुवारी महिन्यापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. अनुरागच्या ऑफिसमध्येच या दोघांची पहिली भेट झाली. 

<3

A photo posted by shwetabasuprasad11 (@shwetabasuprasad11) on

दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रकारानंतर श्वेता पुन्हा एकदा उभी राहिलीय... आणि सध्या ती तिच्या आयुष्यात आनंदात आहे.