ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता

८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झालीय. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

Updated: Feb 27, 2017, 11:48 AM IST
ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता title=

लॉस अँजेलिस : ८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झालीय. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

मुनलाईट हा सिनेमा समलिंग मुलं वयात येत असताना त्यांच्या आयुष्यात जी स्थित्यंतरं घडतात त्यावर आधारित आहे. अलीनं या चित्रपटात अत्यंत दर्जेदार भूमिका केली आहे. गेल्यावर्षीची सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अलीसिया विकेंडरच्या हस्ते अलीला यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला. प्रियांका चोप्राचीही ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली.