माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

Updated: May 28, 2016, 06:02 PM IST
माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट title=

मुंबई : नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडनंही डोक्यावर घेतलं आहे. 

सैराट चित्रपटाबरोबरच त्याची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटाच्या झिंगाट या गाण्यावर माधुरी दीक्षित, रितेश देशमुख आणि अक्षय कुमारनं डान्स केला. 

अँड टीव्हीवरच्या सो यू थिंक यू कॅन डान्स या शोमध्ये रितेश देशमुख आणि अक्षय कुमारनं हाऊसफूल 3 या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी हजेरी लावली. त्यावेळी या तिघांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. 

पाहा माधुरी, रितेश आणि अक्षयचा झिंगाट डान्स