मुंबई: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या लिपलॉक किसच्या फोटोंवर चंदावरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. राम जेठमलानी यांनी मला विचारूनच किस केल्याचं लीना चंदावरकर यांनी म्हटलंय.
एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीनुसार लीना- राम जेठमलानी यांच्या 'किस'चे किस्से समोर आल्यानंतर काही दिवसांपासून लीना यांना अनेक फोन आणि मॅसेजेस येत होते. त्यात त्यांना त्या फोटोंवरून अतिशय अश्लील कमेंट्स केल्या जात होत्या.
लीना यांचं म्हणणं आहे, 'जेव्हा मी स्टेजवर चढत होती, तेव्हा मला चक्कर आल्यासारखं वाटलं. मी जेठमलानी यांची मदत घेतली. यानंतर स्टेजवर त्यांनी मला विचारलं की, मी तुम्हाला किस करू शकतो आहे, उत्तरात मी हो म्हटलं.'
लीना पुढे म्हणाल्या, "राम जेठमलानी ९२ वर्षाचे आहेत. मात्र त्यांचं हृदय आजही तरूण आहे आणि मी त्यांच्या शानदार भाषणांची चाहती आहे."
यानंतर लीना यांनी हसून सांगितलं, "लोकं त्यांच्यासाठी वाईट बोलतात, पण मी एकच सांगू इच्छिते, ना उम्र सीमा हो, ना उम्र हो बंधन."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.