मुंबई : एक सामान्य मुलगी मीरा राजपूत आणि बॉलिवूडचा स्टार शाहीद कपूर यांचा विवाह सोहळा यंदाच्या वर्षातलं मोठ्ठं आकर्षण ठरलं... ही जोडी लग्नानंतरही चर्चेत आहे... पण, शाहीदला मात्र मीडियात मीराची चर्चा मात्र खटकतेय.
शाहिदनं आपल्या लग्नापूर्वी आपल्या खाजगी जीवनाबद्दल एक चक्कार शब्द काढला नव्हता... यामुळे शाहिदच्या पत्नीबद्दल - मीराबद्दल मीडियात आणि शाहिदच्या फॅन्समध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली होती.
मीरा-शाहिदच्या लग्नानंतर लगेचच चर्चा सुरू झाली ती मीराच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल... शाहिदच्या आगामी 'एके VS एसके' नावाच्या सिनेमात मीराही झळकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
याचबद्दल जेव्हा साशाला काही पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा शाहिदनं 'नाही, हे साफ चुकीचं आहे... आणि माझ्या पत्नीला यासर्वातून बाहेर ठेवा... तिचा या इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही' असं म्हणत पत्रकारांना चांगलंच फटकारलं.
'ती फिल्मी बनण्यापासून फार लांब आहे' असंही शाहिदनं यावेळी म्हटलंय... शाहिद - मीरा या जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर काही बदल घडले का? या प्रश्नावर मात्र शाहिदनं 'होय काही जबाबदाऱ्या वाढल्यात... पण, त्या चांगल्यासाठीच' असं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.