घटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या तुटलेल्या जोडीमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खान या जोडीचंही नाव समोर येत होतं. पण, कुणालनं मात्र या चर्चांना आपल्या शब्दात मजेशीर उत्तर दिलंय. 

Updated: Apr 16, 2016, 03:32 PM IST
घटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर... title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या तुटलेल्या जोडीमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खान या जोडीचंही नाव समोर येत होतं. पण, कुणालनं मात्र या चर्चांना आपल्या शब्दात मजेशीर उत्तर दिलंय. 

सल्लमान खानच्या भाषेत त्यानं 'एक बार जो मैंने कमिटमेंट दे दी तो फिर मे प्रेस की भी नही सुनता' असा टोला त्यानं मीडियाला हाणलाय. 

घटस्फोटाची चर्चा...

'स्पॉटबाय' बेवसाईटनं दिलेल्या बातमीनुसार, सोहा आणि कुणालमध्ये खटके गेल्या दोन महिन्यांपासून खटके उडू लागलेत... त्यामुळे दोघांच्या नात्यातील तणावही वाढलाय. तसंच ३७ वर्षांच्या सोहा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय... आणखी काही सिनेमे तिला करायचेत... आणि यासाठी ती आत्ताच आई बनण्यासाठी तयार नाही. परंतु, कुणाल आणि त्याचे कुटुंबीय मात्र यासाठी तयार नाहीत... त्यामुळेच या जोडप्यात वारंवार खटके उडत आहेत, असं या बातमीत म्हटलं होतं.