बहुप्रतिक्षित ख्वाडा चित्रपटाचं पहिलं टीझर रिलीज

 भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ख्वाडा चित्रपटाचा ऑफिशियल टिझर रिलीज झाला आहे. 

Updated: Sep 23, 2015, 02:25 PM IST

मुंबई : भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ख्वाडा चित्रपटाचा ऑफिशियल टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्कंठा लागून आहे. या सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

पैसे नव्हते, म्हणून जमीन विकून चित्रपट काढला
भाऊ कऱ्हाडे यांचा 'ख्वाडा' हा मराठी सिनेमा, २२ ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. ‘माझ्या या सिनेमाने आपल्याला चांगले दिवस येतील,’ असा विश्वास भाऊराव कऱ्हाडे यांनी कुटुंबीयांना दिला, आणि ख्वाडा चित्रपटासाठी भाऊ कऱ्हाडे यांनी आपली जमीन विकली, ८० ते ९५ लाखात 'ख्वाडा' निर्मिती केली आहे.

'ख्वाडा'ला दोन राष्ट्रीय पुरस्कार
‘ख्वाडा’ चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नेहमीच स्थलांतरित जीवन जगणाऱ्या एका धनगर कुटुंबाची वास्तवदर्शी कथा ‘ख्वाडा’ मध्ये चित्रित 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.