तैमूर-करीना-सैफ पहिल्यांदाच माध्यमांसमोर

पतौडीचा छोटा नवाब तैमूर अली खान आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत आपल्या महालात हजर झालाय. सैफ-करीनानं आपल्या घराच्या बालकनीमधून माध्यमांसमोर पहिल्यांदाच हजेरी लावली. 

Updated: Dec 22, 2016, 08:44 PM IST
तैमूर-करीना-सैफ पहिल्यांदाच माध्यमांसमोर title=

मुंबई : पतौडीचा छोटा नवाब तैमूर अली खान आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत आपल्या महालात हजर झालाय. सैफ-करीनानं आपल्या घराच्या बालकनीमधून माध्यमांसमोर पहिल्यांदाच हजेरी लावली. 

करीनानं 20 डिसेंबर रोजी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिलाय. करीना-सैफनं आपल्या बाळाचं नामकरण 'तैमूर' असं केल्यानंतर सोशल वेबसाईटवर बरीच चर्चाही झालीय.

सैफ-करीना के साथ घर पहुंचा छोटा नवाब, देखें तस्वीरें
सैफ-करीना-तैमूर

पाच हजार करोडोंचा मालक

करीना-सैफचा मुलगा तैमूर हा पू्र्व भोपाळस्थित 5 हजार करोड रुपयांच्या शाही संपत्तीचा मालक बनणार आहे. यामध्ये एक हजार एकर जमिनीचाही समावेश आहे. यात फ्लॅग स्टाफ हाऊसचाही समावेश आहे. फ्लॅग स्टाफ हाऊस नवाब हमिदुल्लाह खान यांचा पारंपरिक घर होतं... हा एकेकाळी अहमदाबाद पॅलेसचा भाग होता.

सैफ-करीना के साथ घर पहुंचा छोटा नवाब, देखें तस्वीरें
सैफ-करीना-तैमूर

रॉयल नर्सरी

छोट्या नवाबासाठी रॉयल ट्रीटमेंट तयार आहे. त्याच्यासाठी एक खास रॉयल नर्सरी तयार करण्यात आलीय. ही नर्सरी रिताक्षी अरोडा हिनं डिझाईन केलीय. छोट्या तैमूरसाठी लाईट रंगाच्या भिंती सजवण्यात आल्यात. सफेद रंगाचा एक झोपाळाही तयार आहे.