मुंबई : दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यात प्रोफेशनली एक चांगली मैत्री आहे. त्यामुळेच, या दोघांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय.
नुकत्याच एक मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत करणनं करिनाबद्दल असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. 'करीना माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे जिच्याशी मी खूप जास्त जवळ आहे' असं करणनं यावेळी म्हटलंय.
सोबतच, करण म्हणतो 'मला असं नेहमी वाटतं की माझी पत्नी असती तर ती करीनासारखी असती.... किंवा माझी एखादी बहिण असती तर ती बेबोसारखीच स्वीट असती... किंवा मी कुणाबरोबर डेटिंग करत असेल तर ती निश्चितच करीना असती.... पण, करीनाच्या आणि माझ्या मैत्रीला काही चौकटी आहेत... माझ्या मनात एखाद्या स्त्रीबद्दल जी इमेज आहे त्यात '
'बेबो' करणच्या आगामी 'ब्रदर्स' या सिनेमात एक आयटम नंबर सादर करणार असल्याचंही समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.