कपीलच्या फॅन्ससाठी वाईट बातमी

कपील शर्माच्या नव्या शो ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच भागामध्ये शाहरुख खान आपला चित्रपट फॅनच्या प्रोमोशनसाठी आला होता, त्यामुळे कपील आणि शाहरुखचे फॅन आनंदी झाले होते.

Updated: Apr 24, 2016, 09:14 PM IST
कपीलच्या फॅन्ससाठी वाईट बातमी title=

मुंबई: कपील शर्माच्या नव्या शो ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच भागामध्ये शाहरुख खान आपला चित्रपट फॅनच्या प्रोमोशनसाठी आला होता, त्यामुळे कपील आणि शाहरुखचे फॅन आनंदी झाले होते. पण या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. 

कपील शर्माचा हा शो 26 भाग म्हणजेच 13 आठवडे चालणार आहे. खुद्द कपील शर्मानंच ही कबुली दिली आहे. आम्ही जेव्हा कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो सुरु केला होता, तेव्हाही हा शो काही भागांपुरताच मर्यादित ठेवला होता, पण प्रेक्षकांना हा शो आवडल्यामुळे तो आम्ही सुरुच ठेवला, असं कपील म्हणाला आहे. हा नवा शो 13 आठवड्यांमध्ये संपला तरी त्याचा पुढचा भाग लवकरच येईल, असं कपीलनं सांगितलं आहे.