कॉमेडी किंग कपिल शर्माच्या हातात बेड्या

कॉमेडी किंग कपिल शर्माला सीआयडीने अटक केली असे म्हटल्यावर तुम्हाला धक्का बसेल पण हे रिअल लाइफमध्ये नाही तर रील लाइफमध्ये झाले आहे. कौन बनेगा करोडपती शो मध्ये अशा प्रकारे शुटिंग करण्यात आली. 

Updated: Aug 12, 2014, 08:29 PM IST
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या हातात बेड्या title=

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माला सीआयडीने अटक केली असे म्हटल्यावर तुम्हाला धक्का बसेल पण हे रिअल लाइफमध्ये नाही तर रील लाइफमध्ये झाले आहे. कौन बनेगा करोडपती शो मध्ये अशा प्रकारे शुटिंग करण्यात आली. 

कौन बनेगा करोडपती म्हणजेच केबीसीचा पुढील सिझन लवकरच सुरू होणार आहे. या शोचे ओपनिंग १७ ऑगस्ट रोजी कॉमेडियन कपिल शर्मा, फैजल खान, दयानंद शेट्टी, अभिजित, चांग, नीती मोहन आणि अनिरुद्ध दवे यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 

यात दया आणि अभिजीत सीआयडी बनून कॉमेडी किंग कपिल शर्माला अटक करतात आणि त्याच्या हातात बेड्या घालतात. कपिलला कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली याचे गूढ १७ ऑगस्ट रोजी उकलणार आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये कपिल शर्मा हॉट सीटवर दिसणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.