आता जाणवतोय कपिलच्या स्वभावात फरक

एकूण परिस्थिती पाहता असं वाटतंय की, कपिलचा स्वभाव त्याच्या आणि सुनिलच्या वादाचं मुख्य कारण ठरला. कपिलच्या उध्दट आणि बेदरकार स्वभावामुळे त्याला आज या परिस्थितीमध्ये नेऊन सोडलं.

Intern Intern | Updated: Apr 4, 2017, 06:34 PM IST
आता जाणवतोय कपिलच्या स्वभावात फरक title=

मुंबई : एकूण परिस्थिती पाहता असं वाटतंय की, कपिलचा स्वभाव त्याच्या आणि सुनिलच्या वादाचं मुख्य कारण ठरला. कपिलच्या उध्दट आणि बेदरकार स्वभावामुळे त्याला आज या परिस्थितीमध्ये नेऊन सोडलं.

आता मात्र झाल्या घटनांमधून धडा घेत तो स्वत:मध्ये बदल घडवून आणतोय. आपल्या चुका सुधारतोय. 

द कपिल शर्मा शोच्या टीमलाही हा बदल जाणवलाय. आता म्हणे कपिल त्यांच्याशी वाद घालत नाही, त्यांच्याशी आदराने बोलतो. शुटींगला उशीर न करतो वेळेवर पोहचतो.

शोच्या शुटींगला आलेल्या लोकांना तासनतास वाट बघायला लावण्याच्या सवयीमुळेही अनेक कलाकार व बॉलिवूड सेलिब्रिटींचा रोष त्याने ओढवून घेतला होता.

जाउदे चुका सर्वांकडून होतात मात्र त्यातून धडा घेणारा खरा शहाणा असतो. कपिलचा शो सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. चॅनलने दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमुळे तो सध्या चिंतेत आहे.