कमाल खानची ऋषी कपूरला शिवीगाळ, ऋषी कपूरचं चोख प्रत्युत्तर

कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो. तो बॉलिवूडच्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींवर टीका करतो... त्यांचा अपमान करत असतो. आता केआरकेनं ट्विटरवरून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना टार्गेट केलंय. 

Updated: Sep 24, 2015, 05:57 PM IST
कमाल खानची ऋषी कपूरला शिवीगाळ, ऋषी कपूरचं चोख प्रत्युत्तर title=

मुंबई: कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो. तो बॉलिवूडच्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींवर टीका करतो... त्यांचा अपमान करत असतो. आता केआरकेनं ट्विटरवरून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना टार्गेट केलंय. 

ऋषी कपूर यांचा मुलगा म्हणजेच रणबीर कपूर त्यांना सोडून गेला म्हणून ते खूप दारू पितात. त्यांचा मुलगा बॉलिवूडचा जिमी शेरगिल झालाय. त्याचा संजय लीला भंसाळींसोबतचा हनिमूनही वाया गेला, अशा अर्वाच्य शब्दात केआरके बरळलाय.

— Kamaal R Khan-KRK (@kamaalrkhan) September 24, 2015
He @chintskap drinks a litre alcohol evry night to take out his frustration n start tweeting bad abut ppl. This is why evn his son left him.

— Kamaal R Khan-KRK (@kamaalrkhan) September 24, 2015
How can this guy @chintskap call others failure who asked his son to compromise with Sanjay Leela to become a Hero. Sharam Hai Toh Doob Mar.

— Kamaal R Khan-KRK (@kamaalrkhan) September 24, 2015

त्यावर ऋषी कपूर यांनीही उत्तर दिलं. कमाल खान स्वत: एक फ्लॉप अभिनेता आहे, तो नेहमीच असं बरळत असतो, असं ऋषी कपूर यांनी म्हटलंय. तसंच याबाबत ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, असं सांगितलंय.

 

दरम्यान, कमाल खानच्या वडिलांनी ऋषी कपूर यांची क्षमा मागितलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.