प्रसार भारती मंडळावर काजोलची नियुक्ती

प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारणावर प्रसार भारती मंडळ काम पाहत असतं. 

Updated: Feb 20, 2016, 09:15 PM IST
प्रसार भारती मंडळावर काजोलची नियुक्ती title=

नवी दिल्ली : प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारणावर प्रसार भारती मंडळ काम पाहत असतं. 

काजोलची प्रसार भारतीच्या मंडळावर शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. ती नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्धवेळ सदस्य राहणार आहे.

प्रसार भारतीची २४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. या बैठकीला काजोल उपस्थित राहील, अशी आशा प्रसार भारती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

चित्रपटसृष्टीत सहिष्णू-असहिष्णू यामध्ये कोणतीही लक्ष्मणरेषा नाही. जात-पात, धर्म आणि असहिष्णुतेला बॉलिवूडमध्ये स्थान नाही,‘ असे मत नुकते काजोलने व्यक्त केले होते.