... आणि जॅकलिन पुन्हा एकदा प्रेमात पडली!

जॅकलिन फर्नांडिस सध्या कुणाच्या प्रेमात आहे किंवा कोणाला डेट करतेय असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमचं उत्तर सलमान खान येणार असेल तर ते पूर्णत: चुकीचं आहे. जॅकलिन सध्या डेटिंगवर आहे ती म्हणजे इम्तियाज खत्रीसोबत.

Updated: Dec 9, 2014, 07:10 PM IST
... आणि जॅकलिन पुन्हा एकदा प्रेमात पडली! title=

मुंबई : जॅकलिन फर्नांडिस सध्या कुणाच्या प्रेमात आहे किंवा कोणाला डेट करतेय असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमचं उत्तर सलमान खान येणार असेल तर ते पूर्णत: चुकीचं आहे. जॅकलिन सध्या डेटिंगवर आहे ती म्हणजे इम्तियाज खत्रीसोबत.

हा इम्तियाज आहे मुंबईतील एक प्रख्यात उच्चवर्गीय बांधकाम व्यवसायिक आहे. या अगोदर इम्तियाजचं सुश्मिता सेनसोबत अफेअर सुरू होतं. तर जॅकलिनची दिग्दर्शक साजिद खानशी जवळीक होती. मात्र अलिकडेच जॅकलिन आणि इम्तियाजला एका नाईट क्लबमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सुत्रांकडून अशी माहिती आहे की हे दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. या आधीही हे दोघं एकत्र फिरताना दिसले होते.

अद्याप तरी या दोघांपैकी एकानंही या नात्याविषयी कुठंही काहीही वक्तव्य केलेलं नाही. पण इम्तियाजनं मात्र जॅकलिनजवळ आपल्या भावना व्यक्त केल्याचं बॉलिवूड सूत्रांचं म्हणणं आहे. त्याला ‘हो’ असं जॅकलिनकडून उत्तर मात्र अजून काही आलेलं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.