शाहरूखच्या फॅनमध्ये गाणं नाही, पण आहे 'फॅन अॅन्थम'

Updated: Feb 16, 2016, 08:16 PM IST

मुंबई  : शाहरुख खान आणि रोमॅण्टिक गाणी असा सुपरहिट फॉर्म्युला असला तरी किंग खानच्या आगामी 'फॅन' या सिनेमात एकही गाणं नाही.

सिनेमात एक फॅन अॅंथम सॉंग बनविण्यात आले असून त्या गाण्याचा वापर फक्त सिनेमाच्या प्रमोशनसाठी करण्यात येणार आहे...शाहरुखवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून विशाल-शेखर यांनी संगीतबध्द केलं आहे...

एखादा फॅन आपल्या आवडणा-या हिरो बद्दल किती क्रेझी असू शकतो आणि त्याला भेटण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो हे या सिनेमात दाखविण्यात आले आहे...मनीष शर्माने 'फॅन'चं दिग्दर्शन केलं असून हा एक थ्रिलर सिनेमा असणार आहे.....

15 एप्रिल रोजी 'फॅन' प्रदर्शित होणार असून शाहरुख सिनेमात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.