बीफ वादावर काजोलचं स्पष्टीकरण

हॉटेलमधल्या बीफ वादावर बॉलीवूड अभिनेत्री काजोलनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Updated: May 1, 2017, 09:00 PM IST
बीफ वादावर काजोलचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : हॉटेलमधल्या बीफ वादावर बॉलीवूड अभिनेत्री काजोलनं स्पष्टीकरण दिलं आहे. मला देण्यात आलेलं बीफ हे म्हशीचं होतं जे भारतात कायदेशीररित्या मिळतं असं काजोल म्हणाली आहे. बीफचा मुद्दा हा संवेदनशील आहे, म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असंही काजोल म्हणाली आहे.

काही दिवसांपूर्वी काजोलला देण्यात आलेल्या बीफचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काजोलचा मित्र रॅन तिच्यासाठी बीफची डिश बनवली होती. बीफ पेपर वॉटर विथ ड्राय लेनटिल्स अॅण्ड ड्राय बीफ असं या डिशचं नाव होतं.