राणी मुखर्जीच्या घरी हालणार पाळणा!

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली आहे. राणीने २०१४ मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोपडा याच्याशी लग्न केलं होते. 

Updated: Aug 12, 2015, 06:12 PM IST
राणी मुखर्जीच्या घरी हालणार पाळणा! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली आहे. राणीने २०१४ मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोपडा याच्याशी लग्न केलं होते. 

आता राणी प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर ये आहे. पण अजून याची पुष्टी करण्यात आलेली नाही. झी मीडियाचे इंग्रजी वृत्तपत्र 'डीएनए' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार राणी मुखर्जी प्रेग्नेंट आहे. त्यांना मुलगा झाल्यास त्याचे नाव यश ठेवण्यात येणार आहे. राणी मुखर्जीचे दिवंगत सासरे यश चोपडा यांच्या नावावर हे नाव ठेवण्यात येणार आहे. 

यापूर्वी राणी मुखर्जी हिने एका मुलाखतीत म्हटले होते की, मैं बच्चे प्रॉड्युस करना चाहती हू, राणीने सांगितले होते की, मला नेहमी माझे मित्र चिडवतात की तू आई होण्यासाठीच जन्माला आली आहे. 

अजूनही राणीकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राणीचा शेवटचा चित्रपट 'मर्दानी' हा होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.