हृतिकच्या 'मोहनजो दारो' सिनेमाचं टायटल साँग रिलीज

हृतिक रोशनच्या आगामी 'मोहनजो दारो' सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालं आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात हृतिक रोशनचा डान्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे.

Updated: Jul 20, 2016, 06:37 PM IST
हृतिकच्या 'मोहनजो दारो' सिनेमाचं टायटल साँग रिलीज title=

मुंबई : हृतिक रोशनच्या आगामी 'मोहनजो दारो' सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालं आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात हृतिक रोशनचा डान्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे.

कबीर बेदी आणि अरुणोदय सिंह या गाण्यात हृतिकसोबत दिसत आहेत. गाण्यात सिनेमातील अभिनेत्री पूजा हेगडेची मॅजेस्टिक एंट्री दाखवण्यात आली आहे.

या गाण्याला ए.आर रहमान सोबतच अरजीत सिंह, बेला शेंडे आणि सनाह मोइदत्ती यांनी देखील संगीत दिलं आहे. हे गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं आहे.

पाहा व्हिडिओ