दीपिका पदुकोणचा हॅप्पीवाला बर्थ डे.. पण

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अर्थातच दीपिका पदुकोण. दीपिकाचा आज वाढदिवस आहे.

Updated: Jan 5, 2016, 09:12 PM IST
दीपिका पदुकोणचा हॅप्पीवाला बर्थ डे.. पण  title=

प्रशांत अनासपुरे झी मीडिया, मुंबई : बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अर्थातच दीपिका पदुकोण. दीपिकाचा आज वाढदिवस आहे. बॅडमिंटन खेळाडू म्हणून राष्ट्रीय चॅम्पियनशिपर्यंत पोचलेली दीपिका एकाक्षणी मॉडेलिंगकडे वळली आणि पुढे त्याच जिद्दीने तिने बॉलिवूडचा पडदाही गाजवलाय. तिशीच्या दीपिकाने फिल्मी पडद्यावरची दहा वर्षांची इनिंग पूर्ण केलीये.

दीपिका पदुकोण...अलीकडे बॉलिवूडची मस्तानी म्हणूनच दीपिकाची ओळख करून दिली जाते. तिचा हा पडद्यावरचा पिंगा चांगलाच हिट ठरला. 5 जानेवारी 1986 ला जन्मलेल्या दीपिकाने आपली बॅडमिंटनची खेळी अर्धवट सोडून फिल्मी पडदा गाजवायचं ठरवलं आणि झालंय तसंच. 

2006 साली ऐश्वर्या या कन्नड फिल्ममधून दीपिकाने फिल्मी पडद्यावर एन्ट्री घेतली. तर 2007 मध्ये ओम शांती ओममधून बॉलिवूडच्या किंग खानसोबत डबल रोल करत बॉलिवूडच्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री केली. याच फिल्मने तिला फिल्मफेअर बेस्ट डेब्यु एक्ट्रेस एवार्डही मिळवून दिलं. त्यानंतर आलेल्या काही फिल्म्सनी जरूर निराशा केली. 

त्यातच कधी रणबीर कपूरसोबतची ब्रेकअप लव्हस्टोरी तर कधी रणवीर सिंगसोबत जुळलेली लव्हस्टोरी या आणि अशा कांट्रोव्हर्सीमुळे दीपिका वेगळ्याच चर्चेत राहिली.
 
मात्र कॉकटेल, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस,हॅपी न्यू इयर, गोलियों की रासलीला रामलीला, पिकू आणि नुकताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला बाजीराव मस्तानी असा  हिट फिल्म्सच्या यशाचा चढता आलेख  उमटवत दीपिकाने बॉलिवूडवर आपला स्वतंत्र ठसा उमटवलाय. 

बॉलिवूडची हायेस्ट पेड एक्ट्रेस ठरलेल्या दीपिकाला हॅपी बर्थ डे विश करूया आणि  हिट फिल्म्सचा असाच सिलसिला यापुढेही तिने कायम ठेवावा अशीच तिच्या चाहत्यांची आशा असणार यात शंका नाही.