मुंबई: गूगलने एका जाहिरातीत आई-मुलगी यांच्या घट्ट नात्याला दाखवलं आहे. ही एक अशी भावूक जाहिरात आहे, जी पाहिल्यावर प्रत्येक मुलीला आईची आठवण येईल.
गूगलने या जाहिरातीत मुलीच्या शाळेच्या पहिल्या दिवशी, आईपासून वेगळं होण्याची मुलीची भिती आणि आईच्या मनातील चलबिचल या दोन्ही गोष्टी दाखवल्यात. आपलं बोट धरून चालायला शिकवलेल्या आईला जगाची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक मुलीने इंटरनेटची ओळख आईला करुन द्यावी असा संदेश गूगलने आपल्या या जाहिरातीत दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.