गोल्डन ग्लोब एवार्ड्समध्ये देसी गर्ल प्रियंका प्रमुख आकर्षण

यंदाच्या गोल्डन ग्लोब एवार्ड्स सोहळ्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य ठरलं, ते म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राची लक्षवेधी उपस्थिती. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 9, 2017, 08:04 PM IST
गोल्डन ग्लोब एवार्ड्समध्ये देसी गर्ल प्रियंका प्रमुख आकर्षण title=

लॉस एंजेलिस : यंदाच्या गोल्डन ग्लोब एवार्ड्स सोहळ्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य ठरलं, ते म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राची लक्षवेधी उपस्थिती. क्वान्टिको, बेवॉच द्वारे हॉलिवूड इंडस्ट्री गाजवणा-या प्रियंकाची हिट एण्ड हॉट एन्ट्री सर्वांचंचं लक्ष वेधून गेली. 

प्रियंकाच्या हस्ते टेलिव्हिजन कॅटेगिरीतील विजेता बिली बॉब थॉर्टनला गोलायथ टीव्ही सीरिजजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. एकूणच या देसी गर्लचा हॉलिवूडमध्येही आता चांगलाच बोलबाला वाढू लागलाय. गोल्डन ग्लोब एवार्ड्सच्या शानदार सोहळ्यातील प्रियंकाची ही हजेरी तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच सुखावणारी ठरलीये.

हॉलिवूड इंडस्ट्रीत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या गोल्डन ग्लोब एवार्ड्सची घोषणा झाली आहे. नव्या वर्षातला हा पहिलाच आकर्षक आणि तितकाच दिमाखदार सोहळा नेहमीच जगभरातील सिनेप्रेमींचं लक्ष वेधून घेतो. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये  नामवंत सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडला. 

यंदाचा हा 74 वा पुरस्कार सोहळा आहे.  हॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रिटींची मांदीयाळी यानिमित्ताने एकाच रंगमंचावर पहायला मिळते.  यंदाच्या गोल्डन ग्लोब एवार्ड्समध्ये ला ला लॅन्डने सर्वांधिक 7 पुरस्कारांवर मोहोर उमटवत आपली छाप उमटवली आहे. 

ड्रामा कॅटेगिरीमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म ठरलीये मूनलाईट, तर कॉमेडी आणि म्युझिकल कॅटेगिरीमध्ये ला ला लॅन्डने बाजी मारत सर्वोत्कृष्ट फिल्मचा किताब मिळवला. ला ला लॅन्डसाठीच सर्वोत्कृष्ट डिरेक्टर म्हणून  डेमियन चजैलची निवड करण्यात आलीये. तर विदेशी फिल्म कॅटेगिरीमध्ये फ्रान्सच्या एल फिल्मने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळवला.