मुंबई : रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन - 7'मध्ये प्रेमाच्या धाग्यांत गुंफले गेलेल्या कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्यातला प्रेमाचा धागा नऊ महिन्यांत तुटलाय. पण, या दोघांच्या ब्रेकअप दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. हीच घटना त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटण्यामागचं कारण ठरल्याचं समजतंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या नात्याला पुढे नेत गौहर खाननं काही दिवसांपूर्वी कुशालसमोर लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता. परंतु, गौहरला कुशालचा धर्म मात्र पसंत नव्हता. यासाठी तिनं कुशालला धर्म परिवर्तन करण्यासाठीही सांगितलं होतं.
खुद्द कुशाल टंडननं एका मुलाखती दरम्यान ही गोष्ट कबूल केलीय आणि गौहर माझ्यावर धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव टाकत असल्याचं त्यानं म्हटलंय. पण, यासाठी कुशाल मात्र तयार नव्हता.
याच कारणामुळे दोघांनीही आपल्या नऊ महिन्याच्या नात्याला पूर्णविराम देणं योग्य समजलं. ब्रेकअप नंतर कुशालनं वेगवेगळा धर्म असल्यानं नात्यामध्ये अडचणी निर्माण होणं सुरू झालं होतं, असं म्हटलं होतं.
गेल्या काही दिवसांमध्ये गौहरनं कुशालच्या आई-वडिलांची भेट घेत ती लवकरच कुशालची पत्नी बनणार असल्याचे संकेत दिले होते. कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्या ब्रेक-अपनं अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. या दोघांचं नातं लग्नाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचलं होतं पण इथं येऊन दोघांनी आपलं नातंच संपवलं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.