गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘एक हजाराची नोट’

‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आलं. गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाने ठसा उमटवला आहे.  

Updated: Nov 30, 2014, 10:18 PM IST
गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘एक हजाराची नोट’ title=

पणजी : ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आलं. गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाने ठसा उमटवला आहे.  

अत्यंत गरीब असलेल्या महिलेला निवडणुकीच्या काळात एक हजाराची नोट मिळेत. त्यानंतर त्याभोवती ह्या चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटाचा ठसा उमटला आहे.

फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी आज ‘ग्रँडमास्टर’ हा सिनेमा दाखवण्यात आला. श्रीहरी साठे यांनी हा चित्रपट दिग्दर्शीत केला आहे. या चित्रपटात संदीप पाठक, उषा नाईक, पूजा नायक, गणेश यादव आदींच्या भूमिका आहेत. 

पणजीमध्ये 45 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं.  20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचा आज समारोप झाला. 11 दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये सिनेजगतातील दिग्गजांनी हजेरी लावली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.