नवी दिल्ली : छोट्या पडद्यावरील मालिका 'दिया और बाती हम' या कार्यक्रमात छोटी भूमिका निभावणाऱ्या गौतम गुलाटीचं आयुष्य 'बिग बॉस सिझन-8' नं संपूर्णपणे पालटून टाकलंय.
'बिग बॉस सीझन-8' चा विजेता बनल्यानंतर गौतमला एक नवी ओळख मिळालीय. गौतमच्या या विजयानं त्याच्या साऱ्या चाहत्यांना आनंद झालाय. पण, आपल्याला मात्र एक महिन्यापूर्वीच आपण विजेता होणार, याचा अंदाजा लागला होता असं गौतम म्हणतोय.
'मला माहीत होतं की मीच या कार्यक्रमाचा विजेता बनणार... फिनाले अगोदार एक महिन्यापासूनच मला असं वाटत होतं की मीच हा खिताब घरी घेऊन जाणार. चार महिन्यांपर्यंत मी स्वत:ला ज्या पद्धतीनं शांत आणि कूल ठेवलं होतं त्यावरूनच निकाल पक्का होता. मी कधीही राग व्यक्त केला नव्हता. करिश्मा तन्नासोबत झालेल्या भांडणानंतर मी एकटा पडलो होतो... पण, मी कधीही आशा सोडलेली नव्हती' असं गौतम गुलाटीनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.