'पीके' चित्रपटाची आणखी कोटीच्या कोटी उड्डाणं

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने गल्ला जमवण्याच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. फारच कमी दिवसात पीके चित्रपटाचा गल्ला ३०० कोटी रूपयांच्या आसपास आला आहे. पीके चित्रपटाने रविवारपर्यंत २७८ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.

Updated: Jan 3, 2015, 02:56 PM IST
'पीके' चित्रपटाची आणखी कोटीच्या कोटी उड्डाणं title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने गल्ला जमवण्याच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. फारच कमी दिवसात पीके चित्रपटाचा गल्ला ३०० कोटी रूपयांच्या आसपास आला आहे. पीके चित्रपटाने रविवारपर्यंत २७८ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.

 बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमीर खानच्या ‘पीके‘ या चित्रपटाने बॉलिवूडमधील कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. ‘पीके‘ या चित्रपटाने आतापर्यंत 278.52 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आमीर खानच्या यापूर्वीच्या थ्री एडियएटस, धूम थ्री, या चित्रपटांनी देखिल २०० कोटी रूपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला होता. पीके हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आतापर्यंत या चित्रपटाने २७८ कोटी जमवले आहेत. थ्री एडियएट्स हा २०० कोटी जमवणारा पहिला चित्रपट होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.