'फुगे' ट्रेलर : सुबोध-स्वप्नीलचा 'याराना'!

सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी अशी भन्नाट जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे आगामी 'फुगे' या सिनेमात... या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Nov 14, 2016, 09:07 AM IST
'फुगे' ट्रेलर : सुबोध-स्वप्नीलचा 'याराना'! title=

मुंबई : सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी अशी भन्नाट जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे आगामी 'फुगे' या सिनेमात... या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

'फुगे' या सिनेमाचा शिवाजी मंदिर येथे नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी अभिनेता जॉन अब्राहमदेखील उपस्थित होता.  

दोन घनिष्ट मित्रांच्या मैत्रीवर आधारित ही कथा... प्रेम नव्हे तर प्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलंय.